Hamara Mahanagar News

केंद्रात मंत्रीपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांना संधी द्या"; विक्की भुल्लर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल..!"नातं नाही, कर्तृत्व पाहा... काम करणाऱ्यालाच संधी मिळाली पाहिजे" – युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांची भावनिक भूमिका


कल्याण | प्रतिनिधी
युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी संसदरत्न खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद देण्याची मागणी करणारी सोशल मीडिया पोस्ट प्रसिद्ध केली असून, ती सध्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
या पोस्टमध्ये विक्की भुल्लर यांनी म्हटले आहे की, "आमचे खासदार बोलून नाही, तर कामातून उत्तर देतात. त्यांच्या कामाची चर्चा केवळ कल्याण लोकसभेत नाही, तर राज्य आणि देशपातळीवरही होत असते." तसेच, "राजाचा मुलगा म्हणून राजा होत नाही; जो आपल्या कर्तृत्वाने जनतेचा विश्वास जिंकतो, तोच खरा नेता ठरतो," असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पोस्टमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क, विकासकामे, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद आणि सातत्याने केलेल्या जनसेवेचा उल्लेख करत, केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदासाठी त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेक शिवसैनिक आणि समर्थकांकडून त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी पोस्ट शेअर करत "काम करणाऱ्यालाच न्याय मिळावा" अशी भावना व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा सुरू असून, कल्याण लोकसभेतील कार्यकर्त्यांमध्येही ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Post a Comment

0 Comments