Hamara Mahanagar News

सेंच्युरी हॉस्पिटल बी.के बिर्ला मार्ग मध्ये हातगाड्यांचा विळखा; “महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण?” — शिवसेना शाखाप्रमुख सुमित सिंह यांचा गंभीर आरोप

सेंच्युरी हॉस्पिटल बी.के बिर्ला मार्ग मध्ये हातगाड्यांचा विळखा; “महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण?” — शिवसेना शाखाप्रमुख सुमित सिंह यांचा गंभीर आरोप
उल्हासनगर :
शहड परिसरातील सेंच्युरी शाळा ते शहड गावठाण या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्या उभ्या राहत असून संपूर्ण रस्ता अडवला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शाखाप्रमुख सुमित सिंह यांनी केला आहे. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी वाढत असून स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “आयुक्त महोदय रोज या रस्त्यावरून ये-जा करतात, तरीदेखील कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून काही नागरिकांनी “ठेकेदारांकडून 3% घेतले जात असतील तर आता प्रत्येक हातगाडीमागेही पैसे घेतले जातात का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
तर काही हातगाडी चालकांनी दावा केला की, “आम्ही प्रत्येक हातगाडीमागे 300 रुपये स्थानिक नगरसेवकांना देतो, त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असे बोलले जात आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
शिवसेना शाखाप्रमुख सुमित सिंह यांनी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे करावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments