उल्हासनगर : सिंधी समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या चालिया साहेब पर्वाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये झालेल्या धार्मिक भेटींनी केवळ भक्तिमय वातावरण निर्माण केले नाही, तर शिवसेनेच्या राजकीय वर्तुळातही नव्या चर्चेला सुरुवात केली आहे.
उल्हासनगर–१ येथील झुलेलाल मंदिरात उल्हासनगर महानगर प्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) आणि मा. शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण यांनी एकत्रितपणे दर्शन घेतले. तर उल्हासनगर–५ येथील चालिया साहेब मंदिरात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे, शहराच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या राजेंद्र चौधरी–राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज)–रमेश चव्हाण या ‘R R R’ त्रिमूर्तीची एकत्रित उपस्थिती आणि त्याचवेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचीही झालेली उपस्थिती यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेले हे एकत्र येणे अनेकांसाठी साधे दर्शन असले, तरी शिवसैनिकांसाठी मात्र हा एकजुटीचा आणि सक्रियतेचा सकारात्मक संदेश मानला जात आहे. शहरातील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा वाढलेली सक्रियता, कार्यकर्त्यांशी संवाद आणि सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांमध्ये दिसणारी उपस्थिती यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘दोन फड’ झाल्यानंतर पुन्हा एकत्र येणारे चेहरे; शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह शिवसेनेत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर शहरात अनेक समीकरणे बदलली. काही काळ वेगवेगळ्या राजकीय दिशांनी वाटचाल करणारे नेते आणि पदाधिकारी आता पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागल्याने
“शिवसेना पुन्हा एकत्रित ताकदीने मैदानात उतरणार का?” हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर “भीत नाही कोणाच्या बापाला...” अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाल्याचीही चर्चा आहे. या पोस्टचा नेमका संदर्भ किंवा ती कोणाला उद्देशून करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. मात्र, नेत्यांच्या वाढत्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर या पोस्टकडे राजकीय संदेश म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
ही पोस्ट कोणाच्या भूमिकेला उत्तर आहे का? की केवळ कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास व्यक्त करणारा संदेश? याबाबत उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत.
मात्र एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते—शिवसेनेचे नेते पुन्हा मैदानात सक्रिय होताना दिसत आहेत आणि कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण होत आहे. धार्मिक, सामाजिक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून नेते पुन्हा जनतेमध्ये पोहोचत असल्याने शिवसेनेच्या संघटनेला नव्याने बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी कल्याण लोकसभा सचिव श्री. हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर,शहरप्रमुख श्री. सचिन कदम, उत्तर भारतीय शहर संघटक श्री. के. डी. तिवारी, उपशहर प्रमुख श्री. कमलेश मेघांनी,विभागप्रमुख श्री.विनोद सालेकर,प्रमोद पांडेय, श्री. ज्ञानेश्वर मरसाळे,श्री. आदेश पाटील, श्री. विल्सन डिसोजा, श्री. सागर पगारे, श्री. विशाल आंबेकर, समाजसेवक श्री. सुनील पवार, मा. नगरसेवक सतरामदासदादा जेसवानी, श्री. कैलास तेजी, श्री. राजू माने, आदिनाथ कोरडे,शाखाप्रमुख श्री. निलेश वाघ, यांच्यासह असंख्य शिवसैनिक व सिंधी बांधव उपस्थित होते.
आता प्रश्न एकच… ही फक्त सुरुवात आहे का?
चालिया साहेबांच्या चरणी एकत्र आलेले हे चेहरे आणि त्यातून दिसणारी शिवसेनेची वाढती सक्रियता पाहता उल्हासनगरच्या राजकारणात पुढील काळात कोणती नवी राजकीय दिशा तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांच्या मनात मात्र एकच भावना दिसत आहे—
“नेते एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले, तर ताकद नक्कीच वाढते!”
आणि म्हणूनच चालिया साहेबांच्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने उमटलेला हा संदेश केवळ दर्शनापुरता मर्यादित न राहता शिवसेनेच्या नव्या ऊर्जा, एकजुटी आणि सक्रियतेची नांदी ठरतो का, याची उत्सुकता आता शहरातील राजकीय वर्तुळाला लागली आहे.
0 Comments