Hamara Mahanagar News

साधूबेला परिसरातील हजेरी शेडवर कब्जाचा आरोप; शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय आक्रमक

साधूबेला परिसरातील हजेरी शेडवर कब्जाचा आरोप; शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय
उल्हासनगर :
प्रभाग क्रमांक २ मधील साधूबेला परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या हजेरी शेडवर खुलेआम अतिक्रमण व जागा हडप करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी केला आहे.
याबाबत प्रमोद पांडेय यांनी उल्हासनगर महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी आणि आयुक्त महोदय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
“महानगरपालिकेच्या स्वतःच्या जागेचे संरक्षण अधिकारी करू शकत नसतील, तर सामान्य नागरिकांच्या जागेचे रक्षण कसे करणार?” असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

साधूबेला परिसरातील या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments