“हिंदुत्ववादी सरकारमध्ये मुस्लिम ठेकेदारांचा राज?” – मनोज तिवारी यांचा सवाल;
उस्मान ठेकेदारावर गंभीर आरोप, “खासदार माझ्या खिशात” म्हणत अनधिकृत बांधकामांचा धडाका..?
मनोज तिवारी, मिथलेश दुबे आणि संजू घुगे यांची तक्रार — हिंदुत्ववादी शिवसेना खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांनी जनता दरबारात आदेश दिल्याचा दावा, पण कारवाई शून्य; हिंदुत्ववादी भाजप आमदार कुमार आयलानींवरही प्रश्नचिन्ह..?
उल्हासनगर | विशेष प्रतिनिधी
उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाने आता गंभीर राजकीय व प्रशासकीय वळण घेतले आहे.
मनोज तिवारी, मिथलेश दुबे आणि संजू घुगे यांनी केलेल्या तक्रारीत ‘उस्मान’ नावाच्या ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात तक्रारदार मनोज तिवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना थेट सवाल उपस्थित केला आहे:
“हिंदुत्ववादी सरकारमध्ये मुस्लिम ठेकेदारांचा राज चालतोय का?” – मनोज तिवारी
मनोज तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे शहरात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली असून, पालिका प्रशासन, अधिकारी आणि सत्ताधारी जनप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारदारांचा आरोप: अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने उस्मान ठेकेदार बिनधास्त
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, उस्मान नावाचा ठेकेदार उल्हासनगरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करत असून, काही पालिका अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतामुळे त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.
धक्कादायक दावा: “गणेश शिंपीला देवा लागतो हजारो, प्रभाग अधिकाऱ्यांना प्रत्येक कामाला हजारो”देवा लागतो या प्रकरणात सर्वात धक्कादायक दावा असा करण्यात आला आहे की,
तक्रारदारांच्या मते, उस्मान ठेकेदाराने कथितरित्या उच्च अधिकारी यांना ₹50,000 आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी ₹35,000 दिलेले आहेत.
या दाव्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण आणि संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे.
“खासदार श्रीकांत शिंदे माझ्या खिशात आहेत…” – तक्रारदारांचा गंभीर आरोप
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने कथितरित्या असेही म्हटले की:
“खासदार श्रीकांत शिंदे माझ्या खिशात आहेत… त्यामुळे आमदार, खासदार आणि स्थानिक भाजप नगरसेवक छापरू माझे काहीही करू शकत नाहीत.”
या कथित वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी शिवसेना खासदार श्री. श्रीकांत शिंदे, हिंदुत्ववादी भाजप आमदार कुमार आयलानी आणि स्थानिक भाजप नगरसेवक यांच्या नावाभोवती राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जनता दरबारात तक्रार… आदेशही झाले… मग कारवाई का नाही?
तक्रारदारांनी दावा केला आहे की, त्यांनी यापूर्वी हिंदुत्ववादी शिवसेना खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबारात प्रत्यक्ष जाऊन उस्मान नामक ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
तक्रारदारांच्या मते,खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला कारवाईचे आदेशही दिले होते.मात्र, त्या आदेशांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.यामुळे आता शहरात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे:
“जनता दरबारात जाऊनही जर कारवाई होत नसेल, तर आता नागरिकांनी खासदारांकडून अपेक्षा ठेवायची का?”
तक्रारीत नमूद अनधिकृत बांधकामांची ठिकाणे:
📍 बॅरेक क्रमांक 404, पोस्ट ऑफिस समोर, उल्हासनगर-1 (प्रभाग क्रमांक 5)
📍 बॅरेक क्रमांक 390 च्या बाजूला, पापा अपार्टमेंटच्या मागे (प्रभाग क्रमांक 5)
📍 बॅरेक क्रमांक 376, केसाबाई अपार्टमेंटच्या मागे (प्रभाग क्रमांक 3)
📍 राजीव गांधी नगर, ए-ब्लॉक रोड, उल्हासनगर-1 (प्रभाग क्रमांक 3)
तक्रारदारांचा आरोप आहे की, या सर्व ठिकाणी उस्मान नावाच्या ठेकेदाराकडून बेकायदेशीर बांधकामे सुरू असून, कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही...
0 Comments