Hamara Mahanagar News

उल्हासनगर १ पोस्ट ऑफिस परिसर बैरक नं. 390 मधील अवैध बांधकामाला 5 हजारांत संरक्षण..?नगरसेवक छापरूच्या गुर्ग्यांचा ठेकेदाराशी सौदा;


उल्हासनगर १ पोस्ट ऑफिस परिसर बैरक नं. 390 मधील अवैध बांधकामाला 5 हजारांत संरक्षण..?
नगरसेवक छापरूच्या गुर्ग्यांचा ठेकेदाराशी सौदा; 

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या उल्हासनगर प्रभाग क्रमांक 5 मधील बैरक नं. 390 परिसरात सुरू असलेल्या अवैध बांधकाम प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
आमचा च्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार, संबंधित ठेकेदाराला स्थानिक भाजप नगरसेवक छापरू यांच्या निकटवर्तीयांकडून केवळ 5 हजार रुपयांत संरक्षण देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच अवैध बांधकामाविरोधात आवाज उठवला होता. मात्र आता पुराव्यासह समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नगरसेवकांच्या गुर्ग्यांनी ठेकेदाराकडून 5 हजार रुपये घेत पूर्ण संरक्षण दिले, तसेच महानगरपालिकेतील आयुक्त व प्रभाग अधिकाऱ्यांना अजय साबळे देखील “मॅनेज” केले जाईल, असा दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदाराने नियमांना हरताळ फासत बांधकाम सुरू ठेवले असून, गटरसारख्या मूलभूत सुविधांनाही न जुमानता काम केले जात आहे. यामुळे परिसरातील पाणी निचरा व्यवस्था विस्कळीत, वाहतूक कोंडी, तसेच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ तोडक कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील.

दरम्यान, या प्रकरणामुळे ठेकेदार आणि काही स्थानिक भाजप नगरसेवक व राजकीय घटकांमधील संगनमत, तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

5 हजार रुपयांच्या बदल्यात अवैध बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप, आणि त्यासोबत प्रशासनाला “मॅनेज” करण्याच्या चर्चेमुळे, हे प्रकरण आता केवळ बांधकामापुरते मर्यादित न राहता राजकीय संरक्षण आणि प्रशासकीय संगनमताच्या गंभीर चौकशीचा विषय बनले आहे.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आयुक्त महोदयांनी या प्रकरणात लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांचा एकच सवाल आहे—

बैरक नं. 390 मधील अवैध बांधकामावर महानगरपालिका हातोडा चालवणार, की 5 हजारांच्या संरक्षणामागचं संपूर्ण रॅकेट उघड करणार?

सध्या प्रभाग क्र. 5 मधील बैरक नं. 390 येथील परिस्थितीमुळे संपूर्ण उल्हासनगरचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, प्रशासन काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments