Hamara Mahanagar News

उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ; उस्मान ठेकेदारावर कारवाईची मागणी


उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
 स्थानिक नागरिकांच्या मते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने उस्मान नावाचा ठेकेदार बिनधास्तपणे अनधिकृत बांधकाम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू असलेल्या या बांधकामांवर बीट मुकादम आणि संबंधित सहाय्यक आयुक्त कारवाई करत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात मनोज तिवारी यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी तक्रार देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार खालील ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे:

बॅरेक क्रमांक 404, पोस्ट ऑफिस समोर, उल्हासनगर-1 (प्रभाग क्रमांक 5)

बॅरेक क्रमांक 390 च्या बाजूला, पापा अपार्टमेंटच्या मागे (प्रभाग क्रमांक 5)

बॅरेक क्रमांक 376, केसाबाई अपार्टमेंटच्या मागे (प्रभाग क्रमांक 3)

राजीव गांधी नगर, ए-ब्लॉक रोड, उल्हासनगर-1 (प्रभाग क्रमांक 3)

या सर्व ठिकाणी उस्मान नावाच्या ठेकेदाराकडून बेकायदेशीर बांधकाम सुरू असून महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सदर अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून जागा मालक, ठेकेदार आणि संबंधितांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनोज तिवारी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments