Hamara Mahanagar News

शिवसेना जेष्ठ नगरसेवक राजेंद्र सिंह भुल्लर (महाराज) यांच्या पुढाकाराने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा ठराव मंजूर

शिवसेना जेष्ठ नगरसेवक भुल्लर महाराज यांच्या पुढाकाराने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा ठराव मंजूर

📍 उल्हासनगर | दि. 18 मार्च
कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला.

गेल्या दशकभरात मेट्रो, सिमेंट रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल तसेच विविध नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणत विकासाला गती देण्यात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
या कामगिरीची दखल घेत शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) व भाजप गटनेते श्री. राजेश वधरिया यांनी महासभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी एकमताने समर्थन दिले.

यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, श्री. अरुण अशान, श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), सौ. चरणजित कौर भुल्लर तसेच भाजपचे श्री. राजेश वानखेडे व श्री. राजेश वधरिया यांनी खासदारांच्या कार्याचे कौतुक करत प्रस्तावाला अनुमोदन दिले.

दरम्यान, श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी सभागृहात नागरी सत्कार करण्याची सूचना मांडली. या सूचनेला सर्व सदस्यांनी जोरदार समर्थन देत महापौर सौ. अश्विनी निकम व उपमहापौर श्री. अमर लुंड यांनीही मान्यता दिली. परिणामी, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराचा ठराव अधिकृतरित्या मंजूर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments