शिवसेना शाखाप्रमुख निलेश वाघ यांच्याशी संबंधित कथित अवैध बांधकामावरून तानाजी नगरमध्ये वाद; नागरिकांचा तीव्र विरोध
उल्हासनगर |
तानाजी नगर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामावरून सध्या वातावरण तापले असून स्थानिक नागरिकांनी याविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, हे बांधकाम शिवसेना शाखाप्रमुख निलेश वाघ यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे.
परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, हे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने सुरू असून यामुळे परिसरातील सुरक्षितता व नागरी सुविधांवर परिणाम होत आहे. या संदर्भात महानगरपालिका व संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे।
तसेच, काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाला राजकीय संरक्षण मिळत असल्याची चर्चा असून, शिवसेना नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या संरक्षणाखाली हे बांधकाम सुरू असल्याचेही आरोप केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे।
दरम्यान, या प्रकरणी संबंधित पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, वाढत्या विरोधामुळे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।
0 Comments