Hamara Mahanagar News

कल्याण-शहाड येथे झेप्टोवर एक्सपायरी नेस्कॅफे विक्रीचा प्रकार उघड; ग्राहकांची तक्रार

 कल्याण-शहाड येथे झेप्टोवर एक्सपायरी नेस्कॅफे विक्रीचा प्रकार उघड; ग्राहकांची तक्रार 

कल्याण-शहाड परिसरात ऑनलाईन डिलिव्हरी सेवा देणाऱ्या झेप्टो (Zepto) कंपनीविरोधात गंभीर तक्रार समोर आली आहे. येथील एका ग्राहकाला झेप्टोमार्फत मागवलेल्या नेस्कॅफे (Nescafe) उत्पादनाची एक्सपायरी डेट संपलेली असल्याचे निदर्शनास आले.
सदर नेस्कॅफे उत्पादनावर 19/12/2025 ही एक्सपायरी डेट नमूद असूनही तेच उत्पादन ग्राहकाला विक्रीस दिल्याने मोठा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

ग्राहकाने सांगितले की, डिलिव्हरी मिळाल्यानंतर उत्पादन तपासले असता ते एक्सपायरी झाल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
याबाबत संबंधित ग्राहकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद पांडेय यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस विभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर प्रकरणी संबंधित ग्राहकाने झेप्टो कंपनीकडे अधिकृत तक्रार नोंदवली असून, अशा निष्काळजीपणाबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी देखील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन तपास करावा, अशी मागणी केली आहे.

या घटनेमुळे ऑनलाईन डिलिव्हरी सेवांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांनी वस्तू स्वीकारताना काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments