शहाड परिसरातील चाणक्य कोचिंग क्लासेसच्या वर ग्रेस लॉजिंग आणि बोर्डिंगचा व्यवसाय जोरात चालू आहे. या व्यवसायामुळे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम गंभीर आहेत आणि पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.
**विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम**
कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा साठी मुला मुलींना पालक पाठवतात पण क्लासेसच्या वर लॉजिंग चालू झाला आहे आणि हा लॉज मध्ये देह व्यापार चा कारोबार ही चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो.या अभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध मानसिक शारीरिक समस्या निर्माण होतात.
**शैक्षणिक गुणवत्ता**
पालकांनी आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस निवडताना त्यांच्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधा आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे. परंतु, ग्रेस लॉजिंग आणि बोर्डिंगच्या वर चालवलेल्या या व्यवसायामुळे पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.
युवासेना लोकसभा कल्याण जिल्हा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) व स्थानिक शिवसेना विभाग प्रमुखांचा विरोध...!
कल्याण लोकसभा युवासेना सचिव विक्की भुल्लर यांनी या व्यवसायाचा विरोध केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि शैक्षणिक गुणवत्तेची काळजी घेणाऱ्या कोचिंग क्लासेसना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने अशा कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच खाली शिक्षण आणि वरती चद्दर पलटी चा व्यवसाय चा परवानगी स्थानिक पोलीस विभागाने कसा दिला आदी तपास करून परवानगी का नाही दिले उचित कारवाई नाही झाले तर आम्ही शिवसेना स्टाईल मध्ये आम्ही बंद करू..!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. पालक,शिक्षक आणि प्रशाशन यांनी एकत्र येऊन या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.
0 Comments