कल्याण पूर्व परिसरातील आय वार्ड खडेगोलावली येथिल गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात यावी आणि तलाव स्वच्छ करण्यात यावे त्याकरिता शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री जगदीश कोरे यांच्याकडे पत्र देऊन निवेदन ही दिले होते व वेळोवेळी पाठपुरावा ही केला...!
आज त्या निमित्ताने कृत्रिम तलावाची पाहणी शिवसेना कल्याण विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी पाहणी केली तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे असे ठेकेदार व अधिकारी यांना सूचना ही दिली गेली तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून गणपती विसर्जन प्रक्रियेसाठी योग्य व्यवस्था सुनिश्चित केली जाईल तसेच यावेळी उप-अभियंता धर्मेंद्र गोसावी (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) ,पप्पू पिंगळे (माजी नगरसेवक),रमाकांत देवळेकर उपजिल्हाप्रमुख तसेच अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते...!
0 Comments