Hamara Mahanagar News

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांचा निधी वापरूनसुद्धा शिवाजी बाल उद्यानाची दुरावस्था...काम सुरू करण्याचे आदेश असतांना सुद्धा शिवाजी बाल उद्यानाच्या कामात दिरंगाई... तात्काळ विकासकामे सुरू न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा ईशारा...

उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक १,प्रभाग क्रमांक १ कमला नेहरूनगर,धोबीघाट येथील शिवाजी बाल उद्यानाकडे उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाने नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे,उद्यानाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीही अनेक वेळा लाखो रुपयांचा निधी मंजूर झालेला होता,लाखोंची कामे झालेली होती परंतु ती सर्व कामे ही अर्धवट स्वरूपाचीच होती,
सध्या या उद्यानाच्या दुरुस्तीसाठी ६० लाखांचा निधी मंजूर आहे तसेच या विकास कामांचे कार्यारंभ आदेश ही मिळालेले असतांना सुद्धा संबंधित ठेकेदारांच्या मार्फत आद्यापपर्यंत सदरील ठिकाणी संबंधीत विकासकामे सुरू  झालेली नाहीत आणि संबंधित अधिकाऱ्यांचे ही याविषयाकडे कोणतेच लक्ष नसल्याने अतिअवश्यक असलेल्या या विकासकामांना मुद्दामहून उशीर करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी तसेच शिवाजी बाल उद्यानातील ही विकासकामे विनाविलंब सुरू करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे,तसेच
२ दिवसांमध्ये शिवाजी बाल उद्यानातील विकास कामांना सुरुवात न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याच ठिकाणी आमरण उपोषण केले जाईल आणि त्यातून उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाला जाग न आल्यास शेवटी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यासाठी त्यांच्या दालनात मनसे तर्फे आंदोलन केले जाणार असल्याचे मनसेचे मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख,काळु थोरात,कैलाश घोरपडे,संजय नार्वेकर,बादशहा शेख आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments