उल्हासनगर शहरासाठी अभिमानास्पद बातमी – पायल बसुदे हिने भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघात प्रतिनिधित्व करत २३ वर्षांनंतर भारताला AFC Asian Cup साठी पात्र करून दिले आहे. महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव खेळाडू म्हणून तिने उल्हासनगरच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर उज्वल प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
🏅सत्कार समारंभाचा विशेष क्षण
शिवसेना शहरप्रमुख मा. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना लोकसभा सचिव श्री. हरजिंदरसिंह भुल्लर आणि समाजसेविका सौ. परमिंदरकौर भुल्लर यांनी पायल बसुदेचा विशेष सत्कार केला. यावेळी तिला गोलकिपर फुटबॉल किट भेट देण्यात आले.
🌟 प्रेरणादायक वाटचाल
पायलच्या यशातून उल्हासनगरमधील अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळत असून विशेषतः मुलींमध्ये फुटबॉलच्या क्षेत्रात नवी उमेद निर्माण होत आहे. तिचा हा प्रवास संपूर्ण शहरासाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
🙏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
पायल बसुदेला आगामी स्पर्धांसाठी उल्हासनगर शहराकडून आणि देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या खेळातील कौशल्याने भारताला अनेक विजयी क्षण मिळोत हीच अपेक्षा!
0 Comments