उल्हासनगर : नवरात्रोत्सवानिमित्त उल्हासनगर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य होर्डिंगची शहरात चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, या होर्डिंगवर “भाई, आपण पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत,” अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची भावना व्यक्त करत, त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचे बळ आणि आशीर्वाद मिळावेत, अशी सदिच्छा या होर्डिंगच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
उल्हासनगर शहरात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा सुरू असतानाच, या होर्डिंगमुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर व्यक्त करण्यात आलेला विश्वास आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर पाहण्याची इच्छा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या संदेशाकडे आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे.
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वावर आई जगदंबेच्या चरणी ही प्रार्थना अर्पण करण्यात आली असून, या होर्डिंगमधून शिवसेना शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवीच्या भक्तीबरोबरच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या या सदिच्छेमुळे या होर्डिंगने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आई जगदंबेचा आशीर्वाद लाभो आणि भाई एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत, हीच प्रार्थना!
0 Comments