Hamara Mahanagar News

🗞️ "शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खोट्या उल्लेखावरून वाद: शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल!"

🗞️ "शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खोट्या उल्लेखावरून वाद: प्रमोद पांडेय यांचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल!"


न्यूज रिपोर्ट:  
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये विजय सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याचा उल्लेख "उल्हासनगर विभाग क्रमांक १ चे शिवसेना  उपविभाग प्रमुख" म्हणून करण्यात आला होता. यावरून शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पांडेय यांनी स्पष्टपणे सांगितले की, विजय सिंग हे शिवसेनेचे कोणतेही अधिकृत पदाधिकारी नाहीत, आणि अशा व्यक्तीला शिवसेनेच्या नावाने भाजपमध्ये दाखल झाल्याचे सांगणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे. त्यांनी भाजपवर आरोप केला की, "खोटं बोला पण रेटून बोला" हीच भाजपची सवय झाली आहे.प्रमोद पांडेय यांचा बोलणा आहे मी शिवसेना विभागप्रमुख आहे पण मी आज पर्यंत हा आमचा उपविभाग आहे मलाच माहिती नाही मंग हा जादू झाले कशा का...?
त्यांनी पुढे म्हटले की, "तुमचे दिवस एवढे वाईट आलेत का की कोणत्याही एरे-गेरेंना पक्षात घेऊन त्यांना शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून घोषित करता?" पांडेय यांनी भाजपच्या नेत्यांना आव्हान दिले की, "स्वागत करा, पोस्ट लिहा, आम्हाला काही फरक पडत नाही. पण जर आमचा कार्यकर्ता चोरून नेला असेल तर स्पष्ट लिहा. उगाच कुठेही काहीही लिहू नका."

या वादामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, आणि सोशल मीडियावर या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments