शहाड दि.2 नोव्हेंबर :
कल्याण हून मुरबाड, अहिल्या नगरला जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कल्याण मुरबाड - नगर मार्गावरील दुवा समजला जाणारा शहाड उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुढील 20 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे डांबरीकरणाचे काम केले जाणार असून येत्या सोमवारी 3 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे डीसीपी पंकज शिरसाट यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात एक लेखी अधिसूचनाही काढण्यात आली आहे.
असे असणार आहेत पर्यायी मार्ग...
प्रवेश बंद -
१) माळशेज कडुन कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीत डॅम फाटा, मुरबाड येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदरची वाहने ही ठाणे ग्रामीण हददीत डॅम फाटा, बदलापुर रोडने बदलापुर पालेगांव नेवाळी नाका मंलग रोड लोढा पलावा/शिळ डायघर रोड/पत्रीपुल, कल्याण मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद -
२) मुरबाड कडुन शहाड पुलावरून कल्याण कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीण हददीत दहागांव फाटा (रायतागांव) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदरची वाहने ही ठाणे ग्रामीण हददीत दहागांव फाटा (रायतागांव) येथे डावीकडे वळुन वाहोली गांव मांजर्ली दहागांव एरंजडगांव बदलापुर पालेगांव नेवाळी नाका मंलग रोड, लोढा पलावा/शिळडायघर रोड/पत्रीपुल कल्याण मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद -
३) कल्याण कडुन मुरबाड कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण वाहतुक उपविभाग हददीत दुर्गाडी पुल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदरची वाहने दुर्गाडी पुलावरून उजवी कडे वळुन पुढे गोविदवाडी बायपास नेवाळी पालेगांव बदलापुर मार्गे मुरबाडकडे इच्छीत स्थळी जातील. पत्रीपुल चक्की नाका मार्गे
सदर पर्यायी मार्गावरुन जड-अवजड वाहनांना नमुद कालावधीत सकाळी ०६:०० ते सकाळी ११:०० वा. तसेच सायंकाळी १७:०० वा. ते २२:०० वा. पावेतो प्रवेश बंद राहील.
ही अधिसूचना दिनांक ०३/११/२०२५ रोजी ००:०१ वाजेपासुन ते दिनांक २३/११/२०२५ रोजी २४:०० वाजेपावेतो अंमलात राहील.
तसेच ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.
0 Comments