Hamara Mahanagar News

🔸 उ.बा.ठा गटाला मोठा धक्का! शहरप्रमुख कुलविंदर सिंग बैस यांचा जवळचे सहकारी शिंदे गटात; उल्हासनगरमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हेकाही दिवसात उ.बा.ठा चे अजून मोठे पदाधिकारी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत -शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज)


उल्हासनगरच्या उ.बा.ठा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि उ.बा.ठा शहरप्रमुखांचे अत्यंत जवळचे सहकारी व शाखाप्रमुख महेंद्र देसाई आणि राजेश गुप्ता यांनी युवासैनिक, शिवसैनिक व इतर पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उ.बा.ठा गटाच्या पॅनल क्रमांक ३ मध्ये मोठी फूट पडली असून,उ.बा.ठा शहरप्रमुखांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  
कार्यक्रमाला कल्याण लोकसभा युवासेना जिल्हा सचिव श्री हरजिंदरसिंग भुल्लर, उपशहर प्रमुख श्री नंदू भोईर, विभाग प्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय, शाखाप्रमुख श्री मुकेश जाधव, सुमित सिंग, विशाल आंबेकर, विक्रम दूधसागरे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) ची ताकद अधिक बळकट झाली असून, उ.बा.ठा गटाचे शहरप्रमुखांचा राजकीयदृष्ट्या एकटे पडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या घडामोडी निर्णायक ठरू शकतात.
📌 राजकीय विश्लेषकांच्या मते, हा प्रवेश म्हणजे उ.बा.ठा गटाच्या नेतृत्वावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचे संकेत आहेत.

Post a Comment

0 Comments