Hamara Mahanagar News

निलेश शिंदे फाउंडेशन व माजी नगरसेविका सारिका ताई जाधव यांच्या तर्फे कल्याण पूर्व येथे भव्य बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा निर्माण करण्यात आले आहे

निलेश शिंदे फाउंडेशन आणि सारिका ताई जाधव यांच्या संयुक्त विद्यमानाने,गणेशोत्सवात बाप्पाच्या आशीर्वादाने पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करूया......
असे संकल्पना करून निलेश शिंदे यांनी कल्याण पूर्व मध्ये येणारे काटेमानिवली परिसरातील गॅस कंपनी रोडसह चिंचपाडा, खडेगोलावली, भानुशाली वाडी येथील नागरिकांसाठी गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. यामुळे नद्यांचे प्रदूषण कमी होईल आणि जलस्रोतांचे संरक्षण साध्य होईल.आपल्या संस्कृतीला जपत, आपण निसर्गाचे रक्षण देखील करू शकतो. 
बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करून आपण पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करूया.असा कल्याण पूर्व चे नागरिकांना आव्हान शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे नी यावेळी केला 
तसेच सर्व गणेश भक्तांचे सन्मान चिन्ह देऊन येणारे मंडळाचे आभार ही मानात आहे यावेळी आज माजी आमदार अप्पा शिंदे,शिवसेना कल्याण विधानसभा प्रमुख निलेश शिंदे,समाजसेवक सतीश जाधव,समाजसेवक संतोष सावंत व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते व येणारे गणेश भक्तांच्या स्वागत करत आहे...!

Post a Comment

0 Comments