स्व.प्रकाश पेणकर (नाना) यांच्या तृतीय पुण्यतिथीचे औचित्य साधून, कल्याण रिक्शा चालक मालक संगठना तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या विशेष दिवशी, रिक्षा चालक मालक असोसिएशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल, कल्याण यांच्या संयुक्त प्रयत्नांतून मोफत शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना आरोग्य सेवा मिळाल्या आणि समाजातील गरजू व्यक्तींना मदत झाली
या कार्यक्रमाला रमाकांत चव्हाण चालक मालक संगठने चे रिक्शा युनियन अध्यक्ष विक्की भुल्लर यांनी उपस्थित राहून स्व.प्रकाश पेणकर (नाना) यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच यावेळी कोकण जिल्हा रिक्शा युनियन अध्यक्ष प्रणव पेणकर,कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर व युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी या श्रद्धांजली आणि आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. या उपक्रमामुळे स्व. प्रकाश पेणकर यांच्या स्मृतीला अजून एक विशेष मानाचा मुजरा मिळाला आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या कार्याची प्रेरणा जाणवली.
या श्रद्धांजली आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजाच्या सेवेचा एक उत्तम उदाहरण समोर ठेवला आहे. याचे सर्वांनी कौतुक केले आणि या उपक्रमाचे स्वागत केले. या उपक्रमामुळे स्व. प्रकाश पेणकर यांच्या आठवणीतील उज्ज्वल प्रेरणा आणि त्यांच्या समाजसेवेची भावना जिवंत राहिली आहे.
0 Comments