Hamara Mahanagar News

कल्याण लोकसभा चे शिवसेना पदाधिकारी,पत्रकार,नगरसेवक या सर्वांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले


वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज गणरायाचे दर्शन घेण्यात आले. या प्रसंगी कल्याण लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, आणि पत्रकार उपस्थित होते.

कल्याण युवासेना लोकसभा सचिव विक्की भुल्लर यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, आणि शिवसेना प्रवक्ता यांच्याशी सदिच्छा भेट घेतली.


या कार्यक्रमाला उल्हासनगर शहरातील शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासैनिक, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments