उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक जयकुमार केणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत “मी येत आहे प्रभाग क्रमांक 4 तून आशीर्वाद घ्यायला” असा संदेश दिला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
जयकुमार केणी हे प्रभाग क्रमांक 4 चे रहिवासी असून, समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची ओळख एक कार्यक्षम आणि जनतेशी जोडलेली व्यक्ती म्हणून आहे. त्यांच्या या संभाव्य उमेदवारीमुळे प्रभागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधील आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. जयकुमार केणींच्या पुनरागमनाने शिवसेनेच्या स्थानिक संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
0 Comments