Hamara Mahanagar News

शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक श्री.राजेंद्रसिंह वि.भुल्लर (महाराज) यांच्या मागणीला यश प्रभाग क्र. 3 विदर्भ वाडी येथील निकृष्ट दर्जाचे कलवट तोडून पुनर्बांधणी सुरुवात...!


उल्हासनगर महापालिकेचे शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह वि. भुल्लर (महाराज) यांच्या मागणीला यश मिळाले आहे. दिनांक 03/01/2025 रोजी त्यांनी केलेल्या मागणीनुसार, प्रभाग क्र. 3 मधील दुनिचंद कलाणी काॅलेज ते महात्मा फुले चौक पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काक्रिटीकरण करताना विदर्भवाडी येथील निकुष्ट्र दर्जाचे बनवलेले कलवट तोडून पुन्हा नवीन बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


भुल्लर (महाराज) यांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत तडजोड न करता पुनर्निर्माणाची मागणी केली होती. महापालिकेने त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत हे काम त्वरित हाती घेतले आणि नवीन कलवट बांधण्यासाठी आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री.भुल्लर यांनी या कामाच्या दर्जाविषयी आपली काळजी व्यक्त केली होती. आणि या मागणीच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. 3 मधील रस्त्याचे काक्रिटीकरण योग्य प्रकारे करण्यात येईल याची खात्री दिली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रभागातील नागरिकांना उत्तम सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

श्री.भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली हे काम पार पडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना आहे. त्यांनी महापालिकेचे आणि श्री.भुल्लर यांचे आभार मानले आहेत आणि या कामाच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या नवीन बांधकामामुळे उल्हासनगर प्रभाग क्र. 3 मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि येत्या काळात हे क्षेत्र अधिक सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे...!

Post a Comment

0 Comments