त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या समर्थकांनी पॅनल नंबर - १ मधील भावी नगरसेवक तसेच विक्की सारखा कर्तव्यदक्ष माणूस या परिसराच्या विकासासाठी प्रभागातून उभा रहावा असा उल्लेख केला आहे.
विक्की यांची सर्व समाजातील असणारी लोकप्रियता विशेषतः उत्तर भारतीय समाजामध्ये त्यांची असणारी सलगी लक्षात घेता, तसेच तरुणांमध्ये असलेली त्यांच्या बाबतची उत्सुकता व त्यांची कार्य करण्याची पद्धत यावर प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक आकर्षित झालेले आहेत. प्रभाग क्रमांक - १ मधील नागरिक आत्ताच ते नगरसेवक नसतानाही आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात.
जर विक्की भुल्लर यांनी निवडणूक लढण्यास इच्छुकता दर्शवली, तर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.
विक्की भुल्लर यांच्याशी आम्ही संपर्क केल्यास, त्यांचे असे म्हणणे आहे की माझी पॅनल नंबर १ मध्ये लढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व मतदारांशी माझा संपर्क झालेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की पॅनल नंबर १ मधील काही भाग हा कधीकाळी त्यांचे वडील राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वॉर्डमध्ये होता, त्यामुळे तेथील मतदार हे त्यांच्या नेहमीच संपर्कात असतात.
तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागासाठी विविध प्रकारच्या निधीही आम्ही आमच्या माध्यमातून आणले आहेत आणि प्रभागातील समाजसेवक व विविध समाजाचे प्रतिनिधी यांचीही इच्छा आहे की मी त्या प्रभागातून उभा राहू. परंतु त्यांनी असे सांगितले आहे की पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल…!
0 Comments