Hamara Mahanagar News

भगवान भालेराव की ओमी कलानी उल्हासनगर मध्ये वाजणार कोणाची तुतारी ...?



२०२४ विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ओमी कालानी यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी ,त्यांच्या सुनबाई सौ .पंचम कलाने व पुत्र ओमी कालानी यांनी नुकतीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतलेली होती.
त्यामुळे मतदारसंघात अशी चर्चा चालू होती की ओमी कालानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडूनच लढणार.

पण काल उल्हासनगर चे रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ,मा.उपमहापौर भगवान भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची जनसंवाद दौऱ्यामध्ये भेट घेऊन ते सुद्धा उल्हासनगर विधानसभेमधून आमदारकी लढण्यास इच्छुक आहेत .
लवकरच भगवान भालेराव हे तुतारी हातात घेणार आहेत .
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील हे श्री भगवान भालेराव यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल आहेत.
काय भगवान भालेराव उमेदवारी आणण्यासाठी यशस्वी ठरतील का? 
जर भगवान भालेराव हे उमेदवारी आणण्यासाठी यशस्वी ठरले तर उल्हासनगर मध्ये पहिल्यांदाच एका मराठी माणसाला आमदार होण्याची संधी भेटेल अशी चर्चा शहरात चालू आहे.

Post a Comment

0 Comments