उल्हासनगर 1 महावितरण विभागात ‘हप्ता वसुली’चा आरोप? मीटर एन्ट्रीसाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार
उल्हासनगर (प्रतिनिधी):
उल्हासनगर-1 येथील महावितरण (बिजली) विभागातील काही कर्मचारी, अभियंता व ज्युनियर इंजिनिअर यांच्यावर मनमानी कारभार व भ्रष्ट व्यवहाराचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहेत.
नवीन वीज मीटर बसवूनही त्याची अधिकृत नोंद (एन्ट्री) मुद्दाम केली जात नाही आणि त्यासाठी पैशांची मागणी केली जाते, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
सी ब्लॉक, ममता अपार्टमेंट, फ्लॅट क्र. 205 येथील ग्राहक विक्रम उद्यम सिंग (ग्राहक क्र. 021515457817, मीटर क्र. M42511484714) यांनी सांगितले की, त्यांना जवळपास सहा महिन्यांपासून कार्यालयाचे चकरा मारायला लावल्या जात आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून मीटर एन्ट्रीसाठी पैशांची मागणी केली जात असून, पैसे दिल्याशिवाय नोंद केली जाणार नाही असे सांगितले जात असल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, क्लर्क, ज्युनियर इंजिनिअर व इतर अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असून ‘घेणा-देणा’ शिवाय काम होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
0 Comments