Hamara Mahanagar News

दीपेश म्हात्रे यांचा उबाठा प्रवेशाने युवासेनेला काडी मात्र फरक पडणार नाही - कल्याण युवासेना लोकसभा सचिव विक्की भुल्लर आज श्री. जितेन प्रल्हाद पाटील यांची "युवासेना कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष" पदी नियुक्ती ही करण्यात आली.


आज कल्याण लोकसभेचे युवासेना जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काही माजी नगरसेवकांसह उबाठा मध्ये प्रवेश केला. या घटनेने स्थानिक राजकारणात खळबळ माजवली आहे. परंतु, युवासेना कल्याण लोकसभा सचिव विक्की भुल्लर यांनी स्पष्ट केले की, दीपेश म्हात्रे यांच्या जाण्याने युवासेनेला काही फरक पडणार नाही.

विक्की भुल्लर यांनी सांगितले की, "दीपेश म्हात्रे हे आमचे जुने मित्र आहे आणि आम्ही त्यांचा सोबत पक्षाचे काम केले आहे यांच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे, परंतु त्यांच्या जाण्याने युवा सेनेच्या कार्यात कोणताही अडथळा येणार नाही. आमचे कार्यकर्ते आणि नेते एकत्रितपणे काम करत आहेत आणि आम्ही आमच्या उद्दिष्टांवर ठाम आहोत."
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "आम्ही आमचे नेते मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांचा पाठीशी आहोत आणि आमच्या संघटनेच्या विकासासाठी काम करत राहू."

कल्याण लोकसभेतील राजकीय वातावरण आता अधिक तापलेले आहे आणि आगामी निवडणुकीत या घटनेचा काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
तसेच सोशल मीडिया फेसबुक पेज शिवसेना उल्हासनगर शहर शाखा तर्फे दीपेश यांचा वर पोस्ट ठाकण्यात आले आहे 
आणि उ.ब.ठा ला प्रश्न विचारण्यात आले आहे की ज्यांना गद्दार म्हणत होते आता तेच निष्ठावंत झाले का...?😜😜

तसेच विक्की भुल्लर यांनी संगीताला की शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज श्री. जितेन प्रल्हाद पाटील यांची "युवासेना कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष" पदी नियुक्ती ही करण्यात आली. 


Post a Comment

0 Comments