Hamara Mahanagar News

कल्याण पूर्व मधील करपेवाडी परिसरातील बिल्डर चे हुकुम शाही मनमानी विरुद्ध शिवसेना चे माजी नगरसेवक निलेश शिंदे मैदानात..!

कल्याण पूर्व मधील करपेवाडी परिसरातील  1500 ते 2000 घरे बिल्डर ने क्लस्टर योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले आहे नागरिकांना या बाबत काही माहिती न देता एक महिन्यात घर खाली करण्यास सांगितले गेले होते या मुळे कल्याण पूर्व चे नागरिक भयभीत झालेले होते त्या सैकड़ों नागरिकांनी ही समस्या कल्याण पूर्व चे शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे कडे मांडली. 

त्यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिका के नगररचना विभागाचे अधिकारी सचिन घुटे यांची भेट घेऊन नागरिकाना सोबत घेऊन एक आढावा बैठक घेतली तसेच संबंधित बिल्डरला फोन करून या  बळजबरी बाबत जाब देखील विचारला. क्लस्टर राबवताना कोणत्याही नागरिकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या राहण्याची योग्य ती सोय लावून, त्यांना घरभाड्याची योग्य ती रक्कम मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ही बाब नागरिकांच्या व पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे आभार मानले...!

Post a Comment

0 Comments