उल्हासनगर शहरात ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत,ज्यामुळे नागरिकांना अपघाताचे व वाहतूक कोंडीचे अनेक समस्या निर्माण होत आहेत, ज्यामध्ये अनेक बाईकस्वार व रिक्षांचे अपघात देखील झाले आहेत हे लक्षात घेता शिवसेनेचे जेष्ठ मा नगरसेवक श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांचा मार्गदर्शनाखाली व कल्याण युवासेना लोकसभा सचिव व रिक्शा युनियन अध्यक्ष श्री हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 1 आगस्ट २०२४ रोजी महानगरपालिका प्रशासन यांना पत्र देण्यात आले.
तसेच त्यांना सूचित करण्यात आले की येत्या ७ दिवसात जर हे खड्डे महानगरपालिके तर्फे भरण्यात नाही आले तर युवासेना स्व:खर्चाने रस्त्यावरील वाहतूक रोखून हे खड्डे भरण्यात येईल व याला पूर्णपणे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार असतील.
यावेळी उल्हासनगर रिक्षा युनियन दत्ता म्हत्रे, रमेश सिह,मारुती ढोणे,अनंता टावरे, चे पदाधिकार व शिवसेना चे जयकुमार केनी,जितू उप्पध्याय,विनोद साळेकर, प्रमोद पांडेय, कृष्णा सातपुते, रवी मारसळे, बिपीन सिंग,प्रताप मैत्रे,राजू साळवी,सुमित सिंग,विशाल अंबेकर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते ...!
0 Comments