Hamara Mahanagar News

उल्हासनगर आर.पी.आय (A) जिल्हाध्यक्ष / मा.उपमहापौर श्री. भगवानजी भालेराव राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाटेवर …..... ?

ऑक्टोबर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक समोर ठेवून उल्हासनगर मध्ये आर .पी. आय .(A) गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर श्री. भगवान भालेराव यांनी राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा श्री.शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. 

शहरांमध्ये राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झालेली आहे की मागील निवडणुकीत अपक्ष लढलेले श्री. भगवान भालेराव यावेळेस राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढतात की काय व लवकरच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )या पक्षात प्रवेश करतात की काय...?

असे झाल्यास व पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कालानी कुटुंब काय भूमिका घेतात याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
त्यातच लोकसभेमध्ये कालानी परिवाराने महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांना उघडपणे मदत केलेली होती .त्यामुळे महाविकास आघाडी त्यांना विधानसभेचे तिकीट देणार नाही अशी सुद्धा चर्चा चालू आहे.कालानी कुटुंब सुद्धा विधानसभा लढणारे नक्कीच आहे.
उल्हासनगर चे आमदार श्री .कुमार आयलानी यांना यावेळेस विधानसभेच्या तिकिटासाठी पक्षांतर्गत विरोध खूप मोठ्या प्रमाणात आहे.त्यांच्याच पक्षामध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
उल्हासनगर शिवसेनेचे युवानेते श्री.हरजिंदरसिंह भुल्लर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी आमदार असा केला होता त्यामुळे ते सुद्धा विधानसभा लढण्याची इच्छुक आहेत. 
भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष व उद्योजक श्री. संजय गुप्ता हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे .श्री.संजय गुप्ता यांनी निवडणूक लढण्यासाठी शहरांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रम यापूर्वी सुरू केलेले आहेत.

त्यामुळे यावेळची विधानसभेची निवडणूक उल्हासनगर शहरात रंजक अशी निवडणूक होणार आहे असे नागरिकांचे मत आहे

Post a Comment

0 Comments